---Advertisement---
---Advertisement---
अमळनेर : संतश्री सखाराम महाराज यांची अमळनेर – पंढरपूर पायी वारीने गुरुवारी (१२ जून) रोजी विठ्ठल नामाच्या गजरात मोठ्या उत्सहात प्रस्थान केले. या दिंडीचे नेतृत्त्व संत श्री प्रसाद महाराज हे करीत आहेत. ही दिंडी ५ जुलैपर्यंत पंढरपूरला पोहचेल.
संतश्री सखाराम महाराज संस्थानतर्फे आयोजित अमळनेर-पंढरपूर पायी वारीचा शुभारंभ विठ्ठल नामाच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात झाला. गुरुवारी सकाळी अमळनेरहून प्रस्थान झालेल्या या दिंडीचे नेतृत्त्व संतश्री प्रसाद महाराज करत असून, ही दिंडी ५ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.
या पायी वारीची परंपरा सन १७८५ पासून सुरू असून, यंदा तब्बल ५७५ किलोमीटरचा प्रवास २४ दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. दररोज सरासरी २५ ते ३० किलोमीटरचा पायी प्रवास नियोजित आहे.
पंढरपूर येथे ५ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या मानाच्या दिंड्यांचे स्वागत अमळनेरच्या वाडी संस्थानच्या गादीपदी असलेल्या महाराजांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्वागतात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मानाच्या दिंड्यांचा समावेश आहे. गाववेशीवर त्यांना मानाचे नारळ देऊन स्वागत केले जाते आणि त्यानंतर या सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात.
वारीचे तपशीलवार वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
३ जून: पारोळा – आडगाव, १४ जून: भडगाव (थांबा), १५ जून: भडगाव – नगरदेवळा, १६ जून: नेरी (थांबा),१७ जून: नेरी – नागद, १८ जून: नागद – बेलखेडा, १९ जून: नागापूर (थांबा), २० जून: नागापूर – पिशोर, २१ जून: पिशोर – चिकलठाणा, २२ जून: चिकलठाणा – टाकळी, २३ जून: टाकळी – दौलताबाद, २४ जून: वाळुज – म्हारोळा, २५ जून: बिडकिन/ढोरकिन – पैठण, २६ जून: पैठण – शेवगाव, २७ जून: चितळी – पाथर्डी, २८ जून: माणिकदवंडी- धामणगाव, २९ जून: धामणगाव – आष्टी, ३० जून: आष्टी – अरणगाव, १ जुलै: जवळा – करमाळा, २ जुलै: निंभोरे – वडशिवणे, ३ जुलै: दहिवली/सापटणे – करकंब, ४ जुलै: करकंब – गुरसाळा → पंढरपूर (उशिरा रात्री) ५ ५ जुलै रोजी पंढरपूर येथे संध्याकाळी मानाच्या दिंड्यांचे स्वागत करणार आहेत.
या पायी वारीत सहभागी होणारे भाविक, संतप्रेमी आणि वारकरी भक्ती व श्रद्धेचा अद्वितीय अनुभव घेत असून संपूर्ण मार्गभर कीर्तन, प्रवचन व हरिपाठाचा सोहळा पार पडणार आहे.