---Advertisement---
जळगाव : जागतिक चिमणी दिन (२० मार्च) औचित्य साधत परळ तसेच कापडी पिशव्या वाटप कार्यक्रम पार पडला. ऑर्किड नेचर फाऊंडेशन तर्फे रविवारी (१५ मार्च) सकाळी ७ ते ८:३० या वेळेत काव्यरत्नावली चौकात हा कार्यक्रम झाला.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आर. एन. कुलकर्णी, उपाध्यक्ष आर. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. मॅक टेक कंपनीचे डायरेक्टर सुधीर चौधरी, उद्योजक संतोष इंगळे आणि नगरसेविका वंदना इंगळे, डॉ. पराग जहागिरदार यांच्या आर्थिक मदतीने तसेच फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या आर्थिक सहकार्यातून परळ वाटप कार्यक्रम शक्य झाला. सुधीर चौधरी आणि डॉ. पराग जहागिरदार यांचे गुलाबपुष्प आणि घरटं देऊन स्वागत करण्यात आले. फाऊंडेशनच्या देणगीदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी रोटेरियन डी. ओ. चौधरी, सरिता खाचणे, उषा शर्मा, शंकरभाई पटेल, ऑर्किड नेचर फाउंडेशनच्या सचिव सुनिता महाजन, कोषाध्यक्ष नितीन अट्रावलकर, डॉ. अमित चौधरी, कार्याध्यक्ष डॉ. विकास पाटील, नानासाहेब वाघ, दीपक तांबोळी, सुनील पवार, उमेश इंगळे, राजेंद्र गोसावी, अतुल कोल्हे, वसंत सोनवणे, जयंत राणे, विलास बरडे, विजय पाटील, उल्हास सुतार, सुनिता गुळवे, ज्योती गोसावी, रिटा येवले, मिनाक्षी सुतार, स्नेहल झोपे, लता इंगळे, नवनिर्वाचित सदस्य महेश जाधव, वाल्मिक साळुंखे, सोमनाथ महाजन या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. तासभरात ३०० परळ वाटप झाले. उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेले महिला, आबाल वृद्ध या सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
चिऊताईचे घरटे ठरले लक्षवेधी
आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले विक्रीसाठी ठेवलेले चिऊताईचे घरटे. चिमण्यांची कमी होत चाललेली संख्या लक्षात घेऊन त्यांच्या साठी निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने ही घरटी तयार करण्यात आली आहेत. या उपक्रमालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. घरट्यांना नागरिकांची पहिली पसंती मिळाली. अनेकांनी घरटं अॅडव्हान्स बुकिंग केले आहे.
विजया नेरकर यांना पर्यावरणमित्र पुरस्कार
फाउंडेशनच्या आजीवन सदस्या विजया नेरकर खास नाशिकहून जळगाव येथे या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यांच्या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून त्या जुन्या साड्यांपासून स्वतः पिशव्या शिवतात. त्यांच्या वयाच्या ७६ व्या वर्षीही अखंड काम सुरूच आहे. फाऊंडेशन तर्फे परळ सोबत कापडी पिशवी द्यावी जेणेकरून नागरिक प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणार नाहीत. यासाठी विजया नेरकर यांनी ३०० पेक्षा जास्त पिशव्या स्वतः आणल्या. त्यांच्या आतापर्यंत केलेल्या सामाजिक आणि निसर्ग संवर्धन कार्याचा गौरव म्हणून ऑर्किड नेचर फाऊंडेशन तर्फे त्यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.









