मंत्री नरहरी झिरवाळांच्या शासकीय बंगल्यात मद्यपान आणि अनैतिक व्यवहार? कथित वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; झिरवाळांच्या अडचणी वाढणार?

---Advertisement---

 

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले असून, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे एका कथित व्हायरल व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एका तृतीयपंथी व्यक्तीची उपस्थिती असल्याचा दावा संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मात्र या व्हिडीओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

शुक्रवारी हा कथित व्हिडीओ अचानक व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात चर्चेला उधाण आले. सोशल मीडियावर या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय वर्तुळातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून, नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत थेट राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “हा प्रकार केवळ एक व्हिडीओ नसून राज्यातील नैतिक अधःपतनाचे उदाहरण आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून मंत्री झिरवाळ यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.” त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांचा आक्रमक पवित्रा अधिकच तीव्र झाला आहे.

दरम्यान, राजकीय दबाव वाढत असल्यामुळे झिरवाळ यांच्या राजीनाम्याच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याची चर्चाही रंगली असून, त्यातून पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे समोर आले. त्यांच्या कार्यालयाकडूनही “अशा कोणत्याही व्हिडीओची माहिती नाही” असे सांगण्यात आले आहे.

झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे मंत्री असले तरी पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. तर राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया देत, “मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही. पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल,” असे म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय आहे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसल्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण तापले असून, पुढील काही तासांत किंवा दिवसांत या प्रकरणात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप: तरुण भारत लाईव्ह या कथित व्हिडिओ प्रकरणाची पुष्टी करत नाही..!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---