---Advertisement---

नशिराबादला दुचाकीला डंपरची धडक; एक ठार, दोघे जखमी

by team
---Advertisement---

जळगाव : शहरात कामानिमित्ताने नशिराबाद येथून येत असलेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली. यात अपघातात दुचाकीवरील एक तरुण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तेजस सुनील बिऱ्हाडे (वय २१, रा. नशिराबाद ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

तेजस बिऱ्हाडे व त्याचे मित्र तुषार युवराज बिऱ्हाडे (वय १९), अजय अफलातून सपकाळे (वय २२ सर्व रा. नशिराबाद ता. जळगाव) खानदेश बँड पथकात काम करतात. हे तिघे गुरुवारी १५ मे रोजी जळगाव येथे बँड पथकाचे काम करण्यासाठी दुचाकीने नशिराबाद येथून निघाले होते. काही अंतरावर आल्यावर राणे हॉटेल जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने तरुणांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातामध्ये तेजस बिऱ्हाडे हा जागीच ठार झाला. तर तुषार व अजय या गंभीर जखमी झाला. या तरुणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद येथील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली. या ठिकाणी तेजसचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेतील डंपर आणि त्यातील चालक हे नशिराबाद पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी जमा केले आहे. तर नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment