---Advertisement---
जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर 1 लाख 59 हजार रुपयांवर तर चांदीचे दर 2 लाख 65 हजार रुपयांवर आले आहेत.
जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचा दर 1 लाख 59 हजार रुपये इतका असून जीएसटीसह हा दर 1 लाख 63 हजार 770 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 2 लाख 65 हजार रुपये असून जीएसटीसह चांदीचा दर 2 लाख 72 हजार 950 रुपयांवर गेला आहे.
दरम्यान, जगात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि ऑइल संकटामुळे अनेक देशांनी गुंतवणूक ऑइल क्षेत्राकडे वळवली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारावर परिणाम होत असून भावात घसरण झाल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.









