धुळे-शिरपूर महामार्गावर भीषण अपघात; नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने ६ वाहनांना दिली धडक, ३ जण जखमी…!

---Advertisement---

 

धुळे-शिरपूर महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात घडला असून, नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात सोनगीर फाट्यावर दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घडला. शिरपूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या रसायन भरलेल्या टँकरचा चालकाचा ताबा सुटल्याने हा प्रकार घडला.

नियंत्रण सुटलेल्या टँकरने उड्डाणपुलाखालील परिसरात धडकांची मालिका घडवली. यात एका शीतपेय विक्री केंद्राला जोरदार धडक बसली, तसेच मका भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह चार दुचाकी आणि एका कारलाही टँकरने चिरडले. या भीषण अपघातात तीन दुचाकी पूर्णपणे टँकरखाली आल्याने त्यांचा चक्काचूर झाला आहे. ट्रॅक्टर, कार आणि इतर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अपघाताच्या या थरारक घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---