जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा संशय

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्री झालेल्या दुचाकी अपघातात एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संजय देशमुख असे मृत तरुणाचे नाव आहे, तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास घडली. दोघेही धानोरा येथून मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमावरून दुचाकीने परत येत होते.
दरम्यान, मृत अक्षय देशमुख यांच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दुचाकीचे नुकसान तुलनेने कमी असणे आणि शरीरावर इतर गंभीर जखमा नसल्याने संशय अधिक बळावल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.
या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---