जळगाव : जळगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांच्या घरावर बनावट गोळीबार झाला होता. या फायरिंगचे कनेक्शन मालेगाव असल्याचे एलसीबी तपासातून उघड झाले आहे. गोळीबार करणाऱ्या फरार दोन संशयितांना पथकाने रविवारी (८ डिसेंबर) मालेगाव येथून ताब्यात घेतले. मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा व त्याचा साथीदार शेख उमर फारुख अहमद हुसेन, अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने मंगळवार, १० पर्यंत पोलीस कटाच्या प्लॅनमध्ये उमेदवार पित्यासह दोन्ही पुत्रांचा सहभाग कोठडी सुनावली.
शेराचौकातील जिदान अपार्टमेंट येथे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांच्या घरावर १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी अहमद शेख यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गुरुवार, ५ रोजी एलसीबीच्या पथकाने इरफान अहेमद मोहम्मद हुसेन, दरेगाव, ता. मालेगाव याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्याने हा गुन्हा अहेमद हुसेन, त्याचा शालक व त्याचा मित्र मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा (रा.मालेगाव) याच्या साथीने केल्याची कबुली दिली.
हा प्लॅन अमलात आणण्यासाठी अहमद हुसेन तसेच मोहम्मद शफीक बाबा हे दुचाकीने मालेगाव येथून जळगावात आले. त्यानंतर अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेनांच्या पुरारीरा फायर फायरिंग करण्याचा कट अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन, त्यांचा मुलगा शेख शिबान फाईज अहमद हुसेन, दुसरा मुलगा शेख उमर फारुख अहमद हुसेन, इरफान अहमद मोहम्मद हुसेन, शरीफ उर्फ बाबा (दोन्ही रा.मालेगाव) यांनी रचला. त्यानंतर फायरिंग केली.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पो. उपनि. दत्तात्रय पोटे, स.फौ. विजयसिंग पाटील, स. फौ. अतुल वंजारी, पो.हवा. अक्रम शेख, हरिलाल पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील, चालक भरत पाटील यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणात पोलिसांनी ५ रोजी शेख अहमद शेख हुसेन (अपक्ष उमेदवार), शिबान फाईज अहमद हुसेन, रा. जळगाव, इरफान अहमद मोहम्मद हुसेन (मालेगाव) यांना अटक केली आहे.