---Advertisement---
मुंबई शहरातल्या पायधुनी भागात एका कुटुंबातील चार जणांनी आधी बिर्याणी खाल्ली मग कलिंगड खाल्लं यातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुंबई शहरातल्या पायधुनी भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री बिर्याणी खाल्ली व त्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी व त्यांच्या दोन मुलांचा समावेश असून घटनेने संपूर्ण परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे. यासह अन्नातून विषबाधा झाल्यामुळे परिसरात भीतीच वातावरण पसरला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अब्दुल डोकाडिया वय 40 व त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया वय 35, मुलगी आयेशा वय 16 व मुलगा जैनब वय 13 यांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत बिर्याणीचा बेत असल्याने रात्रीचे जेवण केले होते. सर्वजण जेवण आटोपून त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरी निघून गेले. त्याच रात्री 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास डोकाडीया कुटुंबातील सदस्यांनी कलिंगड खाल्लं. नंतर काही कालावधी उलटला आणि चौघांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली.
दि. 26 एप्रिल रोजी पहाटे 5.30 ते 6 वाजेच्या सुमारास डोकाडिया कुटुंबातील सदस्यांना उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. सर्वांची प्रकृती चिंताजनक होऊ लागल्याने त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना चौघांची प्रकृती अधिकच बिघडू लागली. यात सर्वात आधी कुटुंबातील 13 वर्षीय जैनबचा सकाळी 10.15 वाजेला मृत्यू झाला. त्यानंतर दिवसभरात डोकडिया यांची पत्नी आणि मोठी मुलगी या दोघांचाही मृत्यू झाला. आणि रात्री 10.30 वाजेच्या सुमारास कुंटुंब प्रमुख अब्दुल्ला डोकडिया यांची ही प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती मिळताच जे.जे.मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र पोलिसांकडून याचा तपास सुरू असून डोकडिया यांच्या जेवणात काही विषारी पदार्थ मिसळले गेले आहेत का? याचा ही तपास सुरू आहे.
सद्यस्थितीत या चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजीच्या अहवालाची प्रतीक्षा असून अहवाल आल्यानंतरच मृत्यू मागचं गुढ उकलणार आहे.









