गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

---Advertisement---

 

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाच दिवसीय निवासी बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सरपंच राजेश वाडेकर, प्राचार्या जयश्री पाटील तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे गिरीष कुळकर्णी, सुधीर पाटील, डॉ. अश्विन झाला आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात नैतिक मूल्यांची रुजवात व्हावी तसेच महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित संस्कारी पिढी घडावी, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे. तसेच गांधीजींच्या एकादश व्रतांचे पालन करण्याची प्रेरणाही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.


यावेळी सरपंच राजेश वाडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, “आपण समाजाचे देणे लागतो. आपल्याला मिळालेली मदत आणि आपण केलेली मदत याची जाणीव ठेवली पाहिजे,” असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्राचार्या जयश्री पाटील यांनी अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकात्मता आणि श्रमसंस्कारांची जाणीव निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
पहिल्या सत्रात गिरीष कुळकर्णी यांनी “बालकांची जबाबदारी, शिबिरातून मिळणारे शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास” या विषयांवर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार, अर्जुन प्रसाद, रौनक, अश्पाक यांच्यासह एकूण ४५ शिबिरार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुधीर पाटील यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---