माजी महापौरांच्या गाडीचा मालेगाव नजीक अपघात ; महाजन दांपत्य थोडक्यात बचावले….

---Advertisement---

 

जळगाव महापालिकेच्या माजी महापौर तसेच भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारला मालेगावजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून जयश्री महाजन आणि सुनील महाजन हे जळगावकडे परतत होते. यावेळी नाशिक–जळगाव प्रवासादरम्यान मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावजवळ हा अपघात झाला.

समोर चालणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्यामुळे महाजन दाम्पत्यांची कार पुढील वाहनावर आदळली. मात्र वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि महाजन दाम्पत्य थोडक्यात बचावले. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. तथापि, जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह कारमधील एकूण पाचही जण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---