Crime News : चांदसर येथे तलाठी हल्ल्यातील चौघांना अटक, दोन ट्रॅक्टर जप्त

जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात तलाठी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर गुरुवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे त्यांचे हाड तुटले आहे. पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, ज्यावर 109, 132, 121(2), 303(2), 112(2), 189(2), 191, 190 या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्याने व पाळधी दुरक्षेत्र धरणगाव पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. आरोपी आहेत – आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी. तसेच, हल्ल्यात वापरलेले दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळी भेट देत वाळू माफियांविरोधात प्रशासन कठोर कारवाई करेल असे सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री आणि विभागीय आयुक्तांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.