---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील एका भागात चार वर्षीय बालिकेवर तिच्या 59 वर्षीय मामे आजोबाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल शहरातील एका भागात राहणारी चार वर्षीय चिमुकली ही दुपारच्या सुमारास घरात आई व भावंडांसह खेळत होती. दरम्यान बालिकेची आई ही नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेल्यानंतर काही मिनिटांनी घरी परतली असता घरात चार वर्षीय चिमुकली ही आढळून न आल्याने तिने तिच्या इतर मुलांसह आजूबाजूला चौकशी केली. दरम्यान घराशेजारीच राहणारे बालिकेचे मामे आजोबा अर्थात बालिकेच्या आईचे मामा यांच्याकडे बालिकेची आई ही चौकशीसाठी गेली असता त्यांचा घराचा दरवाजा हा अर्धवट स्थितीत लावलेला दिसून आला. त्यानंतर बालिकेच्या आईने संशयित आरोपी अर्थात बालिकेचे मामे आजोबा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी बालिका कुठे आहे मला माहित नाही असं सांगितलं. त्याचवेळी संशयित आरोपी मामे आजोबा हे अर्धनग्न अवस्थेत दिसून आला. बालिकेच्या आईला संशय आल्याने तिने मामे आजोबा अर्थात तिच्या मामाच्या घरात जाऊन मुलीचा शोध घेतला. त्याचवेळी चार वर्षीय बालिका ही घरात आढळून आली. आईने त्या बालिकेला घरी आणलं आणि बालिकेला विचारपूस केली असता. बालिकेने आईला घडलेल्या सर्व घटनेची माहिती दिली. आणि त्याचवेळी बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित मामे आजोबा यांच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत संशियतास अटक केली असून या नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आमच्या ताब्यात द्यावे. अशी मागणी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी केली. आणि मोठी गर्दी ही पोलीस स्टेशनच्या आवारात जमा झाली होती. त्यानंतर एरंडोल शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कासोदा फाट्याजवळ परिसरातील महिला व नागरिक आणि नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ही विस्कळीत झाली होती. एरंडोल शहरात झालेल्या बालिकेच्या अत्याचाराच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. असून त्या ठिकाणी शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या व पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक शंकर पवार हे करत आहेत.
दरम्यान कासोदा फाटा जवळ रास्ता रोको आंदोलन करतेवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह हवालदार अनिल पाटील, आकाश शिंपी, पोपट सोनार, सचिन पाटील, दीपक पाटील, यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी धाव घेऊन जमावाची समजूत काढून विस्कळीत झालेली वाहतूक ही पूर्ववत केली.









