खेळ बनला काळ: लपंडाव खेळताना उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून ८ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

---Advertisement---

 

लहान मुलांचा निरागस खेळ कधी काळाचा घाला ठरेल याचा कोणालाही नेम नसतो. अशीच एक हृदयद्रावक घटना अमरावती शहरातील अकोली मार्गावरील न्यू शिक्षण कॉलनीमध्ये घडली आहे. मित्रांसोबत लपंडाव खेळताना एका ८ वर्षांच्या चिमुरड्याचा उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून करुण अंत झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासकीय सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक अमोल ठाकरे (वय ८ वर्षे) हा रविवारी (दि. २६) सायंकाळी आपल्या मित्रांसोबत घराबाहेर लपंडाव खेळत होता. रात्री ८ वाजेच्या सुमारास मित्रांच्या नजरेतून लपण्यासाठी कार्तिक जवळच असलेल्या एका निर्माणाधीन घराच्या दिशेने धावला. त्या घराचे बांधकाम अर्धवट असल्याने तिथे एक ६ फूट खोल सेफ्टी टँक खोदलेला होता, ज्यामध्ये सुमारे ५ फूट पाणी भरलेले होते.
​परिसरात अंधार असल्याने कार्तिकला त्या उघड्या टँकचा अंदाज आला नाही आणि तो थेट पाण्यात कोसळला. कार्तिकची उंची टँकमधील पाण्यापेक्षा कमी असल्याने तो पाण्यात बुडाला.
​चप्पलमुळे लागला शोध
​बराच वेळ झाला तरी कार्तिक घरी परतला नाही आणि खेळणाऱ्या मित्रांनाही तो कोठे दिसेनासा झाला, तेव्हा शोधाशोध सुरू झाली. शोध घेत असताना निर्माणाधीन घराबाहेर कार्तिकची चप्पल दिसून आली. संशय आल्याने स्थानिकांनी टॉर्चच्या प्रकाशात टँकमध्ये पाहिले असता कार्तिक पाण्यावर तरंगताना आढळला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---