जळगावात गोडाऊनमधून गॅस वितरणास बंदी; सिलिंडर घरपोच देणे बंधनकारक, नियम मोडणाऱ्या एजन्सींवर कारवाई होणार?

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील गॅस एजन्सी धारकांसाठी जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. यानुसार, घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा आता केवळ घरपोच पद्धतीने करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांनी या संदर्भातील आदेश पारित केले आहेत. गॅस एजन्सी किंवा गोडाऊनमधून ग्राहकांना थेट सिलिंडर देण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

इंधन पुरवठ्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, गोडाऊन किंवा कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या स्थानिक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, घरपोच सिलिंडर देण्याच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता गॅससाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---