मुली दरिद्री मुलांच्या नादी लागतात; पळून गेलेल्या मुली सुखी राहत नाहीत; इंदुरीकर महाराजांचं विधान…!

---Advertisement---

 

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी तरुण, विद्यार्थ्यांसह शेतकरी कुटुंबातील मुलांना समाजप्रबोधनपर आवाहन केलं आहे. मोर्चे, दंगली आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये तरुणांचा वापर केला जातो, मात्र त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात, असा इशारा त्यांनी दिला. आज कोणत्याही नोकरीसाठी किंवा कामासाठी पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य झालं आहे. अशा परिस्थितीत एखाद्या दंगलीत नाव आलं, तर पुढील आयुष्य अडचणीत येऊ शकतं, असं इंदुरीकर महाराजांनी सांगितलं. “या प्रकारांत बहुतेक वेळा गरिबांची मुलंच अडकतात, श्रीमंतांची नाहीत. त्यामुळे तरुणांनी सावध राहावं,” असंही ते म्हणाले.

परीक्षा काळात मोबाईलवर बंदीची मागणी इंदुरीकर महाराजांनी केली…..

दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात असल्याची खंत इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली. मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याने परीक्षा काळात शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.
“आजकाल मुलं अभ्यास करण्याऐवजी खेळ, अ‍ॅप्स आणि मोबाईलमध्ये गुंतलेली दिसतात. परीक्षेच्या काळात हे चित्र बदलायला हवं,” असं मत त्यांनी मांडलं.

शेतीबाबत स्पष्ट भूमिका;

इंदुरीकर महाराजांनी शेतीविषयीही स्पष्ट भूमिका मांडली. स्वतः काही काळ शेती करून पाहिल्यानंतर, केवळ शेतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे इतर मार्ग शोधावेत, असा सल्ला त्यांनी दिला. “भाजी, किराणा किंवा इतर छोटे व्यवसाय जे रोजचं उत्पन्न देतात, त्याकडे तरुणांनी वळावं,” असं त्यांनी सांगितलं.

मुली दरिद्री मुलांच्या नदी लागतात: इंदुरीकर महाराज 

“मुलगी हुशार मुलावर कधीही प्रेम करत नाही, ती कधीही चांगल्या मुलाच्या नादी लागत नाही. मुलगी ही दरिद्री मुलाच्याच नादाला लागते, त्याच्यावरच प्रेम व्यक्त करते. विहिरीवरच्या मोटारी चोरणारे, गाड्यांचे पार्ट चोरतो अशा मुलांच्या मागे मुली लागतात. एखादी मुलगी दरिद्री मुलाबरोबर पळून गेली तर ती आयुष्यात कधीही सुखी होत नाही. तिने सुखी असल्याचं सांगावं, मी तिच्या घरी सहा महिने भांडी घासतो. जिने आई-बापाची मान खाली केली ती मुलगी आयुष्यात कधीही सुखी होत नाही.” असंही इंदुरीकर महाराज म्हणाले..

दंगलीत सहभागी होणाऱ्यांचा वापर फक्त यूज अँड थ्रो

आज सर्वत्र कॅमेरे, सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञान असल्यामुळे दंगलीत सहभागी झाल्यास सहज ओळख पटते. अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होऊ शकते, याकडे लक्ष वेधत इंदुरीकर महाराजांनी तरुणांना या सगळ्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं.

वादग्रस्त वक्तव्यांवर महाराजांची भूमिका;

माझ्या कोणत्याही वक्तव्यांवरून नेहमीच टीका होते, यावर प्रतिक्रिया देताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “मी जे बोलतो ते समाजाच्या भल्यासाठी असतं. लोक टीका करतात, शिव्या देतात, पण सत्य सांगणं मी थांबवणार नाही.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---