सोनं पुन्हा महागलं ! गेलं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, जाणून घ्या आजचे दर

---Advertisement---

 

बाजारात गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ-उतार सुरू असून, आजच्या वाढीने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट पुन्हा ताणले गेले आहे. मौल्यवान धातू म्हणून ओळखले जाणारे सोने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे. जळगावच्या सराफ बाजारातही हीच स्थिती पाहायला मिळत आहे.

आजच्या व्यवहारात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. मागील महिनाभरात दरात घसरण झाल्यानंतर, गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 11,500 रुपयांची वाढ झाली असून, किंमत पुन्हा दीड लाखांच्या पुढे गेली आहे.

शनिवार, 28 मार्च रोजी सोन्याच्या दरात आणखी 2,600 रुपयांची भर पडली. त्यामुळे जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा 1,50,380 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही वाढ कायम राहिली असून, आज 3,000 रुपयांची वाढ झाली. त्यानुसार चांदीचा दर जीएसटीसह 2,39,990 रुपयांवर गेला आहे.

दरात झालेल्या या वाढीमुळे, गेल्या काही दिवसांपासून घसरणीमुळे चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने, सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---