---Advertisement---

खुशखबर ! कालबद्ध पदोन्नती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनांसाठी कागदपत्रे सादर करण्याची मुदतीत वाढ

by team

---Advertisement---

जळगाव : महापालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कालबद्ध पदोन्नती, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात २६ सप्टेंबर २०२४ रोजी पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ३१ मेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे सूचित करण्यात आले होते. तथापि, अखिल भारतीय सफाई मजदूर संघ व काही कर्मचाऱ्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. या मागणीनुसार महापालिकेतर्फे कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत १५ जून अशी वाढवण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

कालबद्ध, पदोन्नती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना पुढील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. यात मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल (गट ड कर्मचाऱ्यांना लागू नाही), मत्ता व दायित्व विवरणपत्र (गट ड कर्मचाऱ्यांना लागू नाही), जात वैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे, विभागीय परीक्षा उत्तीर्ण / सूट प्रमाणपत्र, संगणक अर्हता / सूट प्रमाणपत्र, मराठी-हिंदी भाषा प्रमाणपत्र / सूट प्रमाणपत्र, परिविक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश, स्थायित्व प्रमाणपत्र, ना देय – ना चौकशी प्रमाणपत्र देणे आवश्यक असणार आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करताना सर्व अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्यांना याची कल्पना देणे आवश्यक आहे. १५ जून २०२५ पर्यंत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित कर्मचारी लाभांपासून वंचित राहतील आणि त्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांचीच असेल, असा स्पष्ट इशारा महापालिकेने दिला आहे. हा आदेश उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांच्या स्वाक्षरीने आणि आयुक्तांच्या २९ मे २०२५ रोजीच्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment