जळगाव : मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्या मिळकत धारकांना करात 10 टक्के सूट देण्याची योजना महापालिकेने जाहीर केली आहे. या योजेचा लाभ इतर मिळकत धारकांना देखील घेता यावा याकरिता या योजनेस 31 मे पर्यंत मुदत वाढ महापालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली आहे.
2025- 26 या आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करण्याची योजना लागू केल्यापासून आज गुरुवार 15 मे अखेर पर्यंत 23 हजार 342 मालमत्ता मिळकत धारकांनी मालमत्ता कराचा आगाऊ भरणा केला आहे. त्यानी 18 कोटी 29 लाखांचा भरणा केला आहे. जळगाव शहरातील मालमत्ता धारकांनी या योजनेला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच शहरातील असंख्य मालमत्ता मिळकत धारकांकडून या योजने अंतर्गत आम्हास मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे वाढू लागली असून ती जोर- धरू लागली आहे . ही मागणी लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक ढेरे यांनी मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी 31 मे 2025 पर्यंत मुदत मनपा प्रशासनाकडून वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेच्या मुदतवाढीचा लाभ हा जळगाव शहरातील जास्तीत जास्त मालमत्ता मिळकत धारकांनी घ्यावा. व मालमत्ता करात 10 टक्के सूट घेऊन मालमत्ता कराचा आगाऊ भरणा मुदतीत करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन शहरातील तमाम मालमत्ता मिळकत धारकांना आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे मनपा तसेच उपायुक्त धनश्री शिंदे जळगाव महापालिका प्रशासन हा तर्फे केले आहे.
…………………………………..
प्रभागनिहाय भरणा
प्रभाग समिती क्र.- 1
एकूण भरणा रुपये 6.35 कोटी
प्रभाग समिती क्र. -2
एकूण भरणा रुपये 2.63 कोटी
प्रभाग समिती क्र.- 3
एकूण भरणा रुपये 3.86कोटी
प्रभाग समिती क्रमांक.-4
एकूण भरणा रुपये 5.45 कोटी
…………………………………….
या योजनेचा लाभ हा यंदा 31 मे 2025 अखेर पर्यंत दिला जाणार असल्याने शहरातील तमाम मालमत्ता मिळकत धारकांनी याची नोंद घ्यावी. व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन मालमत्ता कराचा आगाऊ भरणा मुदतीत करावा.असे आवाहन शहरातील सर्व मालमत्ता मिळकत धारकांना ज्ञानेश्वर ढेरे तसेच धनश्री शिंदे यांनी महापालिका प्रशासन तर्फे करण्यात आला आहे .