जळगाव : भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवार (२२ मे ) रोजी भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा पुतळ्यास माला व पुष्प अर्पण करून करण्यात आली.
या भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीत प्रामुख्याने महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, मंडळ अध्यक्ष दीपमाला काळे, ज्येष्ठ नगरसेवक भगत बालानी, माजी स्थायी समिती सभापती शुचिता हाडा, माजी नगरसेवक अमीत काळे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, सरोजिनी पाठक, नंदिनी दर्जी, संगीता पाटील, माजी मंडळ अध्यक्ष मनोज काळे, गोपाल पोपटानी, विनय केसवाणी, चेतन तिवारी, केदार देशपांडे, सतीश पाटील, मयुर पाटील, ऋषिकेश शिंपी, रोहित वाघ, संजय अडकमोल, स्वप्नील राजपूत, ललित लोकचंदानी, प्रकाश बालानी, आकाश मोरे, सचिन बाविस्कर, अवि भोळे, नीरज पाटील, सुशील हासवानी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते. मोटरसायकल रॅलीमधे भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद सारख्या घोषणा देण्यात आल्या.