पाळधी बायपासवर भीषण अपघात; आजोबांसह ६ वर्षीय नातू जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावालगत असलेल्या बायपासवरील कढोली फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रॉलामध्ये झालेल्या भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार आजोबा आणि त्यांच्या ६ वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत मृताची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. नुकतीच खरेदी केलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी जळगावला आलेले देशमुख चुनीलाल राठोड हे पत्नी बेबीबाई राठोड व नातू परेश राठोड यांच्यासह दुचाकीने गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॉलाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॉलाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहनासह तो पाळधी पोलीस ठाण्यात आहे. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---