---Advertisement---

Jalgaon Crime News : अपक्ष उमेदवाराचा असाही प्रताप, मतदारांच्या सहानुभुतीसाठी स्वतःच्या घरावरच केला गोळीबार

by team
---Advertisement---

जळगाव :  निवडणुकीत विजयासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार मतदारसंघांत विविध आश्वासन देत असतात. मात्र ,  जळगावातील एक अपक्ष उमेदवाराने मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी चक्क स्वतः च्या घरावरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जळगाव विधानसभा मतदारसंघातून शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांच्या घरावर १८  नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यात अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांनी पोलिसांच्या तपासात सहानुभुती मिळावी या उद्देशाने स्वतःच्या घरावर गोळीबार केला होता, अशी  माहिती जळगाव पोलिसांनी तपास करत उघड केली आहे.

अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांचे मेहरूण शिवारात शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी गाठले होते.

चोहोबाजूने बाजूने तपास केल्यानंतर अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनी मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी आपला भाचा, मुलगा, शालक आणि त्याच्या मित्रासोबत मिळून स्वतःच्या घरावर गोळीबार करण्याचे कट रचला. याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी खबऱ्यांची मदत घेत याप्रकरणाचा छडा लावला. यात त्यांना अपक्ष उमेदवारानेच आपल्या चालकाच्या मदतीने हा सगळा कट रचला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख अहमद शेख हुसेन, इरफान अहमद मोहम्मद हुसेन,  शेख शिबान फाईज अहमद हुसेन, मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला. गोळीबार करणारा मोहम्मद शफीक उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हे दोघे फरार असून इतर आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक माहेश्वरी यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment