---Advertisement---
तळोदा : तालुक्यातील बुधावली येथील घराला वेळोवेळी होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे शॉर्टसर्किट होऊन घराला भीषण आग लागून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले या आगीत तीन बकऱ्या , रोकडसह घरातील संसार उपयोगी वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू धान्य देखील जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आगग्रस्त कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
तळोदा तालुक्यातील बुधावली येथील दिलीप सुदाम वळवी यांच्या घराला गुरुवार ५ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वेळोवेळी होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागली. या आगीत घरात बांधलेल्या तीन बकऱ्या तसेच ठेवलेली ७५ हजारांची रोकड, एक मोटर सायकलीसह घरातील जीवनावश्यक वस्तू. सर्व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले. यामुळे वळवी कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक सहाय्य करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आग लागली तेव्हा घरातील सर्व सदस्य रात्री गावात भजन मंडळामध्ये भजने ऐकायला गेले होते. त्याचवेळी घराला अचानकपणे आग लागली. याची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी आग विझवण्याच्या आटोकाट प्रयत्न केला असता सर्व प्रयत्न असफल होऊन आगीने रुद्र रूप धारण केले. भीषण आगीत घरात बांधलेल्या तीन बकऱ्या, ७५ हजारांची रोकड, एक मोटारसायकल यासह जीवनाश्यक, संसार उपयोगी वस्तू जाळून खाक झाल्यात. वेळोवेळी होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचे बोललं जात होते.









