पाल येथे कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीवर लोखंडी मुसळीने हल्ला; पत्नी जखमी….!

---Advertisement---

 

रावेर तालुक्यातील पाल येथे एका व्यसनी पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे दारूच्या नशेत असलेल्या पतीने केवळ मुलाला वाचवण्यासाठी मध्यस्थ केल्याच्या रागातून पटणीवर लोखंडी मुसळविणे प्रहार केला याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुस्कान फिरोज तडवी वय वर्ष 23 या आपल्या पतीसोबत पाल येथे राहतात. 23 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पती फिरोज गफूर तडवी हा दारू पिऊन घरी आला आणि मुलाला विनाकारण मारहाण करू लागला. मुलाला वाचवण्यासाठी मुस्कान तडवी धावून गेल्या असता फिरोजचा राग अनावर झाला. रागाच्या भरात फिरोजने मुस्कान यांना असलेली शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. इतक्यावरच न थांबता त्याने मुस्कान यांच्या उजव्या हाताच्या दंडाला जोरात चावा घेतला त्यानंतर घरातील लोखंडी मुसळी उचलून मुस्कान यांच्या डोक्यावर आणि अंगावर जोरात मारून त्यांना गंभीर जखमी केले “तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देखील दिली.

जखमी अवस्थेत मुस्कान तडवी यांनी रावेर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोग्य फिरोज तडवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---