विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीचा संताप अनावर; पत्नीच्या प्रियकराची हत्या केली, प्रायव्हेट पार्ट जाळलं, हादरवणारी घटना….!

---Advertisement---

 

बिहारमधील मोतिहारी येथे विवाहबाह्य संबंधातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराचा संशय आल्याने पतीने त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अस्लम नावाचा युवक नेपाळमध्ये कामासाठी राहत होता. तो अनेक दिवस घरी न आल्याने त्याची पत्नी तब्बू हिची ओळख अस्लमचा मित्र अजय याच्याशी वाढली. कालांतराने दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांचे संबंध अधिक घट्ट झाले. दरम्यान, अजयने तब्बूला भेटण्यासाठी घरी येण्यास सांगितले होते. त्याने तिच्यासाठी भेटवस्तू आणल्याचेही सांगितले होते. ठरल्याप्रमाणे अजय रात्री तब्बूच्या घरी आला. मात्र त्याचवेळी अचानक अस्लमही घरी पोहोचला आणि संपूर्ण प्रकार त्याच्या लक्षात आला. पत्नी आणि मित्राला एकत्र पाहून अस्लमचा संताप अनावर झाला. त्याने अजयला बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्याच्या खासगी अवयवाला आग लावल्याचा आरोप आहे. त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या धक्कादायक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तब्बू आणि अस्लम यांनी २०२० मध्ये घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. अस्लम हा पिकअप वाहन चालक असून अजय त्याचा जवळचा मित्र होता. अस्लम कामानिमित्त बाहेर असताना अजयचे घरात येणे-जाणे वाढले आणि त्यातूनच तब्बू व अजय यांच्यात संबंध निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---