सोशल मिडियावरची ओळख ठरली जीवघेणी ! जाळ्यात अडकवून दरोडा; १० पट रक्कमेच्या आमिषाने टेकडीवर नेऊन हल्ला….

---Advertisement---

 

सोशल मिडियावर ओळख वाढवत दहा पट रक्कम देण्याच्या आमिषाने एकांतात बोलावून प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम लुबाडल्याची धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी परमिंदरसिंग अमरजितसिंग (रा. न्यू सुखियाबाद, ता. जि. होशियारपूर, पंजाब) यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी हे फास्टफूड व्यवसायिक असून काही दिवसांपूर्वी त्यांचा इंस्टाग्रामवरून संपर्क झाला होता. संबंधित व्यक्तीने १० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले.

या आमिषाला बळी पडून फिर्यादी आणि त्यांचे चार मित्रांना नंदुरबार तालुक्यातील आष्टा गावाजवळील टेकड्यांवर एकांतात बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी धमक्या देत जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान जामदे (ता. साक्री, जि. धुळे) येथील सहा संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि अमोल गुंजाळ करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सोशल मिडियावर कोणत्याही आमिषाला बळी न पडता आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---