---Advertisement---

महिनाभरात ७६० जणांना कुत्र्यांचा तर ३४ जणांना मांजरीचा चावा ; माणूस, बकरा, डुक्कर चावल्याच्याही घटना

by team

---Advertisement---

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागामध्ये एप्रिलमध्ये एकूण ८१४ व्यक्तींनी पाळीवसह भटक्या प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व संबंधित उपचार घेतले आहे. रुग्णालयातील इंजेक्शन विभागात विविध प्राण्याच्या चाव्यावर प्रतिबंधात्मक इंजेक्शन घ्यायला नागरिक येतात.

शहरासह जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. रुग्णालयातील इंजेक्शन विभागामध्ये एप्रिल महिन्यात एकूण ७६० व्यक्तींनी कुत्रा चावल्यामुळे उपचार घेतले आहे. यात ४८६ पुरुष, १५५ महिला तर १२५ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. महिन्याभरात ३४ रुग्णांना मांजर, ६ पुरुषांना उंदीर, एकाला माकड, ३ जणांना डुकर, तर ३ जणांना माणसाने चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. एका महिलेला बोकडाने चावा घेतल्याने उपचार करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी

नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ पाण्याखाली जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. सकाळी ओपीडी विभागात (क्रमांक १०९) तर दुपारी आपत्कालीन विभागाला कक्ष क्रमांक एकमध्ये भेट द्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment