---Advertisement---
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे कुटुंबातील वादातून धक्कादायक प्रकार घडला आहे. कोणतेही ठोस कारण नसताना एका मुलाने आपल्या वडिलांवरच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जखमी वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित मुलाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार बाळू रमेश मोरे (वय ६५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा विनायक याने अचानक शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारला. चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर त्याने दगड डोक्यावर फेकून जखमी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. एवढ्यावरच न थांबता, जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला असून, अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.









