तरूणीवर अत्याचारासह विषप्रयोगाचा प्रयत्न, मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

नंदुरबार : एका युवतीला चारचाकी वाहनात बळजबरीने बसवून अत्याचार करीत, तिला विषारी द्रव पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली. याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल आहे.

तालुक्यातील ओघाणीच्या कुंभीखालपाडा येथील अक्कलकुवा आपसिंग दिला तडवी व चंदा रामा तडवी हे दोघे संशयीत एका तरुणीच्या घराजवळ वाहन घेऊन उभे होते. यात दोघा संशयितांनी तरूणीच्या गावी जावून ‘तिला फोन करुन द्राक्षे घ्यायला ये’ असे बनाव करीत घराबाहेर बोलवले. तरुणी बाहेर आली असता दोघांनी तिचा हात धरुन व रुमालाने तोंड दाबत जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसविले. व पुढे वाहन निर्जन ठिकाणी घेवून जात तेथे आपसिंग दिला तडवी याने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर तिला ठार मारण्याच्या उद्देशाने विषारी द्रव्य पाजले. घाबरलेल्या युवतीने त्या ठिकाणावरून पळ काढत तडक घर गाठत घरच्यांना घटनेची माहिती दिली. यावर तिला घरच्यांनी रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी पिडित युवतीच्या फिर्यादीवरुन आपसिंग दिला तडवी, चंदा रामा तडवी या दोघांविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---