मसूद अझरच्या विश्वासू सहकाऱ्याला अज्ञात वहानाने चिरडले, भारताविरुद्धच्या अनेक कटांमध्ये होता सहभाग

---Advertisement---

 

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका वरिष्ठ कमांडरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेचा प्रमुख मसूद अझर याचा निकटवर्तीय मानला जाणारा मौलाना सलमान अझर याला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे.

सलमान अझर हा जैश-ए-मोहम्मद संघटनेतील महत्त्वाचा चेहरा होता. भारताविरुद्धच्या अनेक कटांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे मानले जाते. संघटनेतील धोरणात्मक निर्णयांमध्ये त्याचा प्रभाव होता, तसेच नव्या सदस्यांची भरती, प्रशिक्षण आणि आर्थिक व्यवहार सांभाळण्यातही त्याची भूमिका होती.

या घटनेनंतर पाकिस्तानमधील सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये, विशेषतः आयएसआय संबंधित वर्तुळात, अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसते. अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या घटनांची मालिका सुरू असल्याने हा अपघात की नियोजित हल्ला, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, स्थानिक तपास यंत्रणा या प्रकरणाकडे साध्या अपघाताच्या दृष्टीने पाहत असल्याचे संकेत आहेत. मात्र, अशा घटनांमागील नेमका सूत्रधार शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. सलमान अझरच्या मृत्यूमुळे जैश-ए-मोहम्मदच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत रचनेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---