यूएई गुंडाळणार पाकिस्तानातील व्यवसाय, दुबईच्या उद्योगपतीला नोटीस बजावणे भोवले

---Advertisement---

 

दुबई : एकेकाळी अत्यंत घनिष्ठ मित्र मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या टोकाच्या वळणावर येऊन ठेपले आहे. पाकिस्तानने दुबईचे प्रसिद्ध अब्जाधीश मलिक रियाझ यांना अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत मागितली आणि त्यांना यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या यूएई सरकारने पाकिस्तानातील व्यवसाय बंद करण्याची आणि गुंतवणूक मागे घेण्याची घोषणा केली.

यूएईच्या निर्णयाने डबघाईस गेलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अल-कादिर ट्रस्ट घोटाळा प्रकरणात अडकलेले दुबईचे उद्योगपती मलिक रियाझ यांना अटक करण्यासाठी पाकिस्तान सरकारने थेट इंटरपोलची मदत मागितली. त्यावरून रियाझ यांना नोटीस बजावण्यात आली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. अशातच यूएईचे परराष्ट्र व्यवहार व आंतराराष्ट्रीय सहकार्य मंत्री अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांनी गुरुवारी समाज माध्यमावरील पोस्टमधून पाकिस्तानातील व्यवसाय बंद करण्याची आणि गुंतवणूक मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर यूएईची दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी एतिसलात यांनीही पाकिस्तानच्या दूरसंचार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी युएईने आपले ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज वसूल करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला. यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा तीळपापड झाला आणि त्यांनी दुबईच्या उद्योजकाविरोधात अटक वॉरंट काढला, इतकेच नव्हे तर त्यांनी अटकेसाठी इंटरपोलची मदत मागितली. यातून दोन्ही देशातील संबंध विकोपाला गेले.

कर्ज फेडले पण संबंध बिघडले

पाकिस्तान आणि युएई यांच्यातील वादाची पाळेमुळे खोलवर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि तुर्कीसोबत मिळून इस्लामिक नाटो बनवण्याच्या हालचाली केल्या होत्या, ज्यामुळे यूएई नाराज झाला. त्यातच इराण युद्धादरम्यान मध्यस्थी करताना पाकिस्तानने यूएईला विश्वासात न घेतल्याने संबंधात अधिक कटुता निर्माण झाली. त्यामुळे कर्ज परतफेडीसाठी यूएईने तगादा

एतिसलातची २६ टक्के हिस्सेदारी

एतिसलातची पाकिस्तानच्या सरकारी दूरसंचार कंपनीत २६ टक्के हिस्सेदारी आहे. एतिसलात कंपनीने गुंतवणूक धोरणाचा आढावा घेत सर्व शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल केवळ यूएईच्या नवीन जागतिक धोरणामुळे उचलले गेले आहे. यापूर्वी यूएईने जगातील सर्वांत मोठ्या तेल-उत्पादक गट असलेल्या ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आता पाकिस्तानातील गुंतवणूक मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने शाहबाज सरकारसाठी हा दुहेरी धक्का आहे.

पाकिस्तानवर काय परिणाम होईल?

पाकिस्तानचा एक प्रमुख मित्रराष्ट्र आणि सर्वांत मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या यूएईची गुंतवणुकीतून माघार ही पाकिस्तानच्या आधीच डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे. यूएईने सर्व गुंतवणूक काढून घेतली, तर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पाकिस्तानला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते. त्यांच्याकडे सौदी अरेबिया आणि कतारसारख्या देशांवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---