जळगाव : मेहरूण स्मशानभूमीत शवदहनामुळे परीसरात राहणाऱ्या नागरीकांना असुविधांचा त्रास होत आहे. दररोज तेथे होणाऱ्या शवदहनामुळे प्रदुषण होत आहे. यात सुधारणा करण्याकरीता या स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी महानगरपालीकेतर्फे लावण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र निवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन मनपाचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांना सोमवारी (१९ मे ) देण्यात आले.
मेहरूण स्मशानभूमीत शवदहन केल्याने परिसरातील नागरिकांना प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी बालविल्यास प्रदूषण कमी होऊन नागरीकांच्या वेळेची देखील बचत होईल. यासोबतच पर्यावरणाचे नुकसान व प्रदुषण होणार नसल्याने वसुंधरा अर्थात पृथ्वीचे संरक्षण देखील होणार आहे. तसेच उन्हाळा, पावसाळामध्ये शवदहन करण्यासाठी स्मशानभूमीत येणाऱ्या नागरीकांसाठी स्मशानभूमीत सभामंडपाचे बांधकाम करावे. याठिकाणी सभामंडप बांधल्यास नागरीकांना याठिकाणी सुविधा प्राप्त होईल. मेहरूण स्मशानभूमीमध्ये इलेक्ट्रीक शवदाहीनी व सभामंडपाचे बांधकाम करून मिळावे तसेच इतर आवश्यक सुविधा देखील लवकरात लवकर मिळवून द्याव्यात, अशी मागणी मेहरूण परीसरातील नागरीकांच्या वतीने अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. निवेदन देतांना मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, उप शहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित (बंटी) शर्मा, चेतन पवार, तालुका संघटक संदीप मांडोळे, सतीश सैंदाणे, महेंद्र सपकाळे, राहुल चव्हाण, महेश माळी आदी उपस्थित होते.