आंबे खाण्यापूर्वी सावधान! आंब्यामुळे कॅन्सरचा धोका? स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक खुलासा…!

---Advertisement---

 

नवी मुंबईतील वाशी मार्केट येथे आंब्यांबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून आंबे लवकर पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे ग्राहकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही व्यापारी आणि कामगार आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी बंदी असलेल्या रसायनांचा वापर करत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः ‘कॅल्शियम कार्बाईड’चा वापर करून आंबे काही तासांत पिवळे केले जात असल्याचा आरोप आहे.

कॅल्शियम कार्बाईड हे रसायन भारतात बंदी घातलेले असून, ते पाण्याच्या संपर्कात आल्यावर अॅसिटिलीन वायू तयार करतो. या प्रक्रियेमुळे फळे कृत्रिमरित्या पिकतात; मात्र यात आर्सेनिक आणि फॉस्फरससारखे घातक घटक असू शकतात. FSSAI च्या नियमांनुसार अशा प्रकारे पिकवलेली फळे विकणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

अशा रसायनांचा वापर केलेले आंबे खाल्ल्यास डोकेदुखी, चक्कर, उलट्या, पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याचा परिणाम लिव्हर आणि किडनीवरही होऊ शकतो. दीर्घकालीन सेवनामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. असं तज्ञांचं मत आहे.

यात विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ग्राहकांनी अतिशय चमकदार आणि एकसारखा रंग असलेले आंबे खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. आंबे खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुणे आणि शक्यतो नैसर्गिकरीत्या पिकलेले फळ निवडणे आवश्यक आहे.

दरम्यान, या प्रकरणावर संबंधित यंत्रणांकडून कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---