---Advertisement---
जळगाव शहरातील वर्दळ असलेल्या आय एम आर कॉलेज नजीक रामबाग कॉलनी परिसरातून अंदाजे 8 लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कंपनीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जळगाव शहरातील रहिवासी प्रदीप जगतसिंग पाटील रा. रामबाग कॉलनी जळगाव हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून ते उच्चभ्रू असलेल्या रामबाग कॉलनी परिसरात त्यांच्या कुटुंबीयांसह वास्तव्य करतात. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी मध्ये रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या मालकीची टाटा नेक्सॉन कंपनीची कार त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर नेहमीप्रमाणे पार्क केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर आहे असता त्यांना त्यांची कार ही त्या ठिकाणी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी सर्वत्र परिसर पिंजून काढला. मात्र शोध घेऊन देखील त्यांची कार कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अद्यात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे.
सदर टाटा नेक्सॉन कंपनीची कार अंदाजे 8 लाख रुपये किमतीची असून ती चोरीला गेल्याने जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या प्रोफेसर कॉलनी आणि रामबाग कॉलनी परिसरात उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीच वातावरण हे पसरला आहे. त्यामुळे मध्यरात्री पोलिसांनी गस्त वाढवावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या चोरीच्या घटनेची प्रदीप पाटील यांनी तक्रार दिली असून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. व याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे हे करत आहेत.









