---Advertisement---

Jalgaon Crime News : शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष, जळगावात एकाला लाखोंचा गंडा

by team
---Advertisement---

जळगाव : आजकाल शेअर मार्केटमध्ये पैसे गुंवणूकीचा ट्रेंड आला आहे. शेअर मार्केटचा पूर्ण अभ्यास न करता गुंतवणूक केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. गुंतवणूकदार शेअर मार्केटबाबत असल्येल्या तुटपुंज्या ज्ञानावर किंवा कोणाकडून टीप घेऊन शेअर मार्केटमध्ये लाखोंची गुंतवणूक करतात. अशा गुंतवणूकदारांच्या अज्ञानाचा काहीजण गैरफायदा शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून  देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करत असतात. अशाच एक  फसवणुकीचा प्रकार जळगाव शहरात उघड झाला आहे. यात एका वृद्धाची ४२ लाखांची फसवणूक केल्याचे घटना घडली आहे.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीत नफ्याचे आमिष देऊन जळगावातील ६५ वर्षीय वयोवृद्धाला ४२ लाख १५ हजारांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार शनिवार, ७ डिसेंबर रोजी उघडकीस आला. रितीका देवी नाव सांगणाऱ्या एका मोबाइल धारकाविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगाव शहरातील यशवंत कॉलनी परिसरामध्ये ६५ वर्षीय वयोवृद्ध कुटुंबासह वास्तव्याला आहेत. शेतीकाम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना एका नंबरवरून रितिका देवी असे नाव सांगणाऱ्या महिलेने व्हॉट्स अॅपवरून (७२२४९३८६३५, ९१७९५०४६७०, ९६६५८२५८१०) त्यांना एक अॅप्लिकेशन पाठवले. त्यांनी त्यात माहिती भरली. शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देऊन त्या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर वृध्दाने सुरुवातीला भरलेल्या पाच लाख रुपयांवर सहा लाख रुपये नफा मिळवून दाखवण्यात आला. या गोष्टीवर वृद्धाचा विश्वास बसला. त्यानंतर तरुणीने त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ४२ लाख १५ हजार रुपये वेगवेगळ्या माध्यमातून स्वीकारले. हा प्रकार १३ ऑक्टोबर २०२४ ते ७ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने शनिवार, ७ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिलेल्या तक्रारीनुसार जळगाव सायबर पोलिसात रितीका देवी नाव सांगणाऱ्या मोबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment