जळगाव : शहरात बंद घरांना फोडून मुद्देमाल चोरून नेण्याचा चोरट्यांचा सपाटा सुरू आहे. रामानंदनगर, एमआयडीसी आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. या प्रकरणी तीनही पोलीस ठाण्यात बुधवार, ६ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.
सुरेंद्र कुमार शंकरलाल जैन (वय ५५, रा. प्लॉट नं. १०, मुक्ताईनगर, एसएमआयटी कॉलेजजवळ) हे व्यावसायिक असून त्यांचे पिंप्राळा शिवारात श्रीरत्न कॉलनीत प्लॉट नं. ३२ या ठिकाणी ज्वेलरी दुकान आहे. सोमवार, ४ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी सायंकाळी ७.३० वाजता दुकानाला कुलूप लावून ते घरी निघून गेले. चोरट्यांनी या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात एण्ट्री केली. दुकानात असलेले ८ हजार किमतीचे १६ नग चांदीचे जोडवे, ७.२०० रुपये किमतीचे १२ नग सोन्याच्या फुल्या, ५०० रुपये रोख, असा एकूण सुमारे १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार बुधवार, ६ रोजी सकाळी उघडकीस आला.
या प्रकरणी सुरेंद्र जैन यांच्या तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पो. हे. कॉ. जितेंद्र राजपूत करीत आहेत. कम्पाउंडवरून मारल्या उड्या राजेंद्र चिंधा पवार (वय ४२, रा. नेहरुनगर, श्रीकृष्ण मंगल कार्यालयाजवळ) है व्यापारी आहेत. चोरट्यांनी मंगळवार, ५ रोजी मध्यरात्रीनंतर त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या कम्पाउंड वॉलच्या भिंतीवरून चोरट्यांनी उड्या मारल्या. त्यानंतर दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चांदीच्या मागील बाजूस तांब्याच्या असलेल्या देवांच्या मूर्ती ५ नग, एक हजार रु. किमतीचे चांदीचे दोन घोडे व चांदीचा झुला, २०० रुपये किमतीच्या दोन पितळी घंटी, १२ हजारांची रोकड, चार हजार किमतीचा मोबाईल, तीन हजार किमतीचा मोबाईल, असा २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार बुधवार, ६ रोजी उघडकीस आला. राजेंद्र पवार यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो. हे. कॉ. सचिन पाटील हे करीत आहेत. टपरीतील २० हजार किमतीचे दोन ब्रेकर मशीन, आठ हजार किमतीचे ब्रेकर मशीन, पाच हजार किमतीचे लहान ब्रोकर मशीन, चार हजार किमतीचे कटर मशीन, १५०० रुपये किमतीचे एक कटर मशीन, एक हजार किमतीची ग्रैंडर मशीन, १५ हजार किमतीचे तोडलेल्या बिल्डींगमधून निघालेली आठ गोणीत भरलेली ताब्यांची तार, असा एकूण ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवार, ६ रोजी ही घटना दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी अफजल शेख यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पो. हे. कॉ. योगेश पाटील हे करीत आहेत.
पत्र्याच्या शेडमधून साहित्य लंपास
अफजल शेख कबीर शेख उर्फ बाबाभाई (वय ४३, रा. बळीरामपेठ) हे जुन्या इमारती तोडणारे कॉण्ट्रॅक्टर आहेत. या व्यवसायाचे साहित्य त्यांनी बळीराम पेठेतील १७ नं. शाळेजवळील गल्लीत पत्र्याच्या शेडच्या त्यांच्या टपरीमध्ये ठेवले होते. चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून टपरीत प्रवेश केला आणि साहित्य चोरून नेले. साध्या वाढत्या चोरीच्या घटनेने नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.