जळगाव : विवाहइच्छुकांना विवाह जुळवितांना आपली फसवणूक होणारं नाही ना ? याची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. विवाह जुळविणाताना नातेवाईक, मध्यस्थ यांची मदत घेतली जाते. विवाहइच्छुक विवाह जुळविणाऱ्या साईटवर देखील आपली नोंदणी करतात. मात्र, अशा काही प्रकरणात फसवणूक होत असल्याचे उघड होत आहेत. लग्न हा मुलां-मुलींच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अशाच प्रकारे विवाह जुळविणाऱ्या साईटवर ओळख झालेल्या एकाने लग्नाचे आमिष दाखवून धुळे येथील एका घटस्फोटी महिलेवर अत्याचार केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी या प्रकरणी विनोद शिवराम कुसळकर (रा. वडपुरा रामनगर, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने विवाह जुळवणाऱ्या एका वेब साईटवर धुळे येथील घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवत जळगाव येथे भेटायला बोलविले होते. यानंतर त्याने मागील मे महिन्यात १८ तारखेला त्या महिलेवर जळगाव रेल्वे स्टेशन शेजारील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर अत्याचार केले .
धुळे येथील ३५ वर्षीय नोकरदार महिलेचा घटस्फोट झालेला आहे. तिची व विनोद कुसळकर याची विवाह जुळवणाऱ्या वेब साईटवर ओळख झाली. या दरम्यान, तरुणाने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला १८ मे रोजी जळगावात भेटायला बोलावले. दोघेही येथे आल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे या तरुणाने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर मात्र, महिलेने त्यांच्या लग्नाविषयी विषय छेडताच विनोद हा टाळाटाळ करू लागला. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने १ जून रोजी शहर पोलिस स्टेशनला विनोद शिवराम कुसळकर विरोधात फिर्याद दिली आहे.