जळगाव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न…

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्याची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत जिल्ह्यातील विकासात्मक कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा तत्काळ लाभ उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश देण्यात आले. तसेच विविध केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत संबंधित विभागांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या कडून सूचना करण्यात आल्या.

यावेळी प्रधानमंत्री फसल बीमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत अभियान, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे व खनिकर्म क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून जिल्ह्याच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, महापौर सौ. दीपमाला काळे, जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे, जि.ग्रा.वि.यं. प्रकल्प संचालक श्री.आर.एस. लोखंडे, उपवनसंरक श्री. जमीर शेख, श्री. धोत्रे व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---