Jalgaon Missing search campaign : महाराष्ट्र राज्यात बेपत्ता होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेता महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांनी 17 एप्रिल ते 15 मे 2025 या कालावधीत हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याकरीता ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले. यानुसार जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष पथक नेमून २३४ व्यक्तींचा शोध घेतला आहे .
राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ‘ऑपरेशन मुस्कान -१३’ ही विशेष शोधमोहीम 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविली गेली होती. याच धर्तीवर आता बालक आणि महिला यांचा शोध घेण्यासाठी राज्यभरात ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 17 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली ही मोहीम 15 मे 2025 पर्यंत राबविण्यात आली. महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे अपर पोलिस महासंचालक यांच्या निर्देशानुसार सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
राज्यात हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याकरीता ऑपरेशन शोध ही विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, यांनी जळगाव जिल्हयातुन हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणेबाबत जळगाव जिल्हा घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना 17 एप्रिल ते 15 मे 2025 या कालावधीत विशेष पथकांची नेमणूक केली. या पथकांना हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे बाबत ऑपरेशन शोध हि विशेष मोहिम राबविणे बाबत आदेश दिले होते.
जळगाव जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचे व पोलीस उपविभागाचे विशेष पथकांनी ऑपरेशन शोध मोहिम अंतर्गत जिल्हा घटकातील पोलीस स्टेशनला दाखल हरविलेल्या प्रकरणांपैकी 147 महिला व 87 पुरुष असे एकुण 234 व्यक्तीचा यशस्वीरित्या शोध घेवुन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. ही ऑपरेशन शोध मोहिम यापुढेही जळगाव जिल्हयामध्ये प्रभाविपणे राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणेकामी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना .पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सुचना दिल्या आहेत.