Jalgaon News : झेडपीतील अधिकाऱ्याकडून व्होट जिहादचा प्रयत्न

जळगाव : सध्या शासकीय यंत्रणांमार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. मात्र शासनाच्या जनजागृतीपर कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविण्यात आले. जनजागृतीच्या नावाने पाठविण्यात आलेल्या या पत्रात मदरशामध्ये जाऊन जागृती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महिला मदरशांमध्ये महिला शिक्षकांना पाठवून जनजागृती करणे, शुक्रवारी नमाजाच्या दिवशी धर्मगुरूमार्फत जनजागृती करणे यासंदर्भात तारखेनिहाय उल्लेख केलेला आहे. त्यामुळे नेमकी ही मतदान जनजागृती की फतवा होता याबाबत जिल्हाभरात या पत्राची चर्चा रंगली होती.


माध्यमिक शिक्षण विभागाचे पत्र
आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या नावाने हे पत्र काढण्यात आले आहे. पत्र काढण्यात आल्यानंतर लागलीच त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांनी तातडीने त्याच जि.प. सीईओंचे पत्र रद्दचे आदेश दिवशी पत्र काढत खुलासा केला आहे. यातील माहिती चुकीची असून त्यावर कोणतीही कार्यवाही करू नये. सदर पत्र रद्द करण्यात आल्याचे सीईओंनी पत्रात स्पष्ट केले आहे.

उपशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस : सीईओ
माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी पठाण यांनी हे पत्र तयार केले असून स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय असे पत्र निवडणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमांबाबत दिले जात नाही. स्वीप नोडल अधिकारी म्हणून जि.प.त मी कार्यरत आहे. मात्र माझ्या परवानगीशिवाय परस्पर हे पत्र माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांनी काढले. संबंधित उपशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी श्रीअंकित यांनी सांगितले.