---Advertisement---

Jalgaon News : तर थेट रस्त्यातील खड्ड्यांमध्ये लावणार झाडे ; मनपाला मनसेचा इशारा , पाहा व्हिडिओ

by team

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी (२७ मे) जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये खड्डेभरो आंदोलन करण्यात आले. यापुढे रस्त्यावर खड्डा दिसला तर त्या ठिकाणी झाडे लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

महानगरपालिका जिथे काम नाही करू शकत तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जनतेला सोबत घेऊन श्रमदान करून स्वखर्चाने मुरूम आणून खड्डे बुजवेल असा इशारा यामुळे देण्यात आला. महानगरपालिका माजी नगरसेवक, आमदार खासदार यांचे जनतेच्या संशयांकडे लक्ष नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला. यांनी आक्रमतेचा पवित्रा हाती घेतलेला आहे, जळगाव शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे दिसतील त्या त्या ठिकाणी आता झाडे लावण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेला दिला.

आंदोलन करते वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्रमदान व खड्डे बुजवण्याचे काम केले. त्यांचे सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी कौतुक सुद्धा केले आणि आभार मानले,

आंदोलन करतेवेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहितचे संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, साजन पाटील, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, विकास पाथरे, उमेश आठरे, विशाल जाधव, विनोद पाटील, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment