जळगाव जिल्हा परिषदेच्या CEO मीनल करनवाल यांची बदली; नवीन CEO म्हणून करिश्मा नायर यांची नियुक्ती….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासनिक पातळीवर महत्त्वाचा बदल झाला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२०१९ बॅचच्या आयएएस अधिकारी मीनल करनवाल यांनी आपल्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांना गती दिली. ग्रामीण आरोग्य सुविधा मजबूत करणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि पाणीपुरवठा योजनांमध्ये सुधारणा करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली होती. तसेच प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवून नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी केला.आता त्यांची नियुक्ती ‘पोकरा’ प्रकल्पाच्या संचालकपदी झाल्याने दुष्काळग्रस्त भागातील शाश्वत शेती, जलसंधारण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी करिश्मा नायर या यापूर्वी नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी शहरी विकास, नागरी सुविधा आणि प्रशासनिक सुधारणा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण विकास प्रकल्पांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच मीनल करनवाल यांनी सुरू केलेल्या योजनांना अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---