---Advertisement---
दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी केंद्र सरकारकडून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंडिया पोस्ट अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी तब्बल 25 हजारांहून अधिक जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
पोस्ट ऑफिसकडून भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वरूनच करावी लागेल. ऑफलाईन किंवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत..
या भरतीची खास बाब म्हणजे उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीतून केली जाणार आहे. अर्ज करताना दहावीची गुणपत्रिका आवश्यक असून, दहावीत गणित आणि स्थानिक भाषा विषय असणे अनिवार्य आहे.
याशिवाय उमेदवाराला सायकल चालवता येणे आवश्यक आहे. देशभरातील ग्रामीण भागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
पोस्ट ऑफिसच्या भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अखेर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.









