---Advertisement---

Leopard Attack : दुर्दैवी…, डांभुर्णीत बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय चिमुकली ठार

---Advertisement---

मनोज नेवे, डांभुर्णी प्रतिनिधी

Leopard Attack in Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. 741 मध्ये मेंडपाळाचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून वास्तव्यास आहे. दरम्यान, बुधवार, 16 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या आईसोबत झोपलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात रत्नाबाई सतीश रुपनर ही ठार झाली आहे. मयत चिमुकली ही आई जिजाबाई रुपनर हिच्याजवळून झोपलेली असताना बिबट्याने तिच्यावर झडप घालत. केळीच्या बागेत पसार झाला होता. गुरुवार, 17 रोजी सकाळी या चिमुकलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत अढळून आला.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, डांभुर्णी शेत शिवार काइभुईच्या जंगलात मेंडपाळचे तीन कुटुंब शेतात वास्तव्याला आहेत. दिवसभर आपल्या मेंड्यांना जंगलात चारून हे कुटुंबिय रात्री झोपी गेले. दरम्यान दोन वर्षीय रत्नाबाईला आपल्या आईच्या कुशीत झोपली होती. तिला बिबट्याने उचलून नेल्याचे मयत चिमुकलीची आई जिजाबाई रुपनर यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसात बिबच्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना यावल तालुक्यात घडल्याने परिसरातील शेतकरी व मजूरांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी घटनेची माहिती दै. तरुण भारत च्या प्रतिनिधीना कळवली असता रात्री एक वाजेच्या सुमारात वन अधिकारी विपुल पाटील, आरएफओ सुनील भिलावे व अन्य सहकार्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शन खाली विपुल पाटीलसह संपूर्ण पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती घेत रात्री गस्तीलाही हे पथक थांबहुन होते. तसेंच डांभुर्णी पोलीस. पाटील यांनी दिलेल्या माहिती वरून यावल पो. नी. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहकार्यनी देखील रात्री घटनास्थळी भेट दिली.

वन विभागाच्या पथकने रात्रीची गस्त घालून सकाळी सात वाजेपर्यंत चिमुकलीचा शोध घेताल असचा चिमुकली 400 मीटर अंतरावर तीन शेत ओलांडून केळीच्या बागेत मृतावस्थेत अढळून आल्याने सर्वांचे अश्रू अनावर झाले. तसेंच वनक्षेत्र पालविपुल पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच सुनील भिलावे हे घटनास्थळी दाखल झाले. तसेंच प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शन खाली फॉरेन्सिक टीम प्रचारणं करण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांत गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस पाटील यांचेकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांनी केला संताप

शासनाच्या चुकीच्या धोरण मुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रात्री अकरा वाजेला जंगलात विजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे शेतकरी बोलत आहेत. एकीकडे रात्री विद्युत पुरवठ्याची समस्या दुसरीकडे हिंस्त्र प्राण्याची भीती त्यामुळे पीक राखणे असह्य झाले आहे. वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वनविभागासह प्रशासनाबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे किनगाव परिसरातील बिबटयाच्या हल्ल्यात मुलगा मयत झाल्याची घटना ताजी असतांना आता दोन वर्षाच्या रत्नाबाईला बिबट्या प्राण्याने उचलून नेल्यामुळे मेंडपाल कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे मागविले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment