---Advertisement---

महावितरणचा कंत्राटी वायरमन ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव : वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचा बनाव उभा करून मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी आणि वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणमधील एका कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७, रा. जळगाव) असे असून तो प्रभात कॉलनी कक्षात कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होता.

तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सापळा रचत ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूषण चौधरी याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जळगावातील तक्रारदाराकडे महावितरणकडून मालकाच्या नावावर असणारे वीज मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरु होती. असे असताना तक्रारदाराच्या घरी तीन दिवसापूर्वी वायरमन भूषण चौधरी आला होता. यावेळी त्याने तक्रादारांना सांगितले की, वीज मीटरचे सील तुटले आहे. या मीटरमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच आर्थिक दंड देखील होऊ शकतो. त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वीज मीटरचा टेस्टिंग रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी वायरमन चौधरीने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.


मंगळवारी १० जून २०२५ रोजी यासंदर्भात एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली. तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपीने पंचासमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, एसीबीने सापळा कारवाईचे नियोजन केले. आज दि. १० जून २०२५ रोजी भूषण चौधरी याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली, त्यावेळी एसीबीने त्याला रंगेहात पकडले. हि कारवाई पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, तपास अधिकारी निरीक्षक स्मिता नवघरे, पथक सफौ सुरेश पाटील (चालक), पोहेकॉ सुनील वानखेडे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment