---Advertisement---
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे आणि राज्यभरात यासाठी मंत्र्यांचे प्रचारार्थ दौरे हे पार पडत आहेत. अशाच एका जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे लातूरच्या रेनापुर इथं प्रचारासाठी गेले होते मात्र प्रचार सभा आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगाव कडे रवाना होत असताना त्यांच्या खाजगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं दोन वेळा प्रयत्न करून देखील टेकऑफ होत नसल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना ही टळली आहे. लातुरच्या रेणापूर ची प्रचार सभा आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगावला जाण्यासाठी परत निघाले होते. विमानतळावर गेल्यानंतर खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाला.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यामुळे विमान वाहतूक यंत्रणेबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थितीत झाले आहे. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे लातूरमध्ये रेणापूर इथं प्रचारासाठी आले होते. प्रचार सभा आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगावला जाण्यासाठी परत निघाले होते. विमानतळावर गेल्यानंतर खासगी विमानात तांत्रिक बिघाड असल्याची माहिती समोर आली. विमानात दुरुस्तीही करण्यात आली होती. मात्र तरी टेकऑफ होत नसल्याने अखेरीस गुलाबराव पाटील यांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागला.









