सिगारेट पिताना किरकोळ वाद आणि शिवीगाळ…..आणि रेल्वे रुळावर डोक्यात दगड टाकून हत्या……आरोपीत अल्पवयीन बालकाचा समावेश…!

---Advertisement---

 

जळगाव मध्ये खुनाची मालीका संपता संपत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जळगावातून पुन्हा खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. सिगारेट पिताना किरकोळ वाद झाला आणि शिवीगाळीच्या रागातून एका लाँड्री व्यावसायिकाच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची धक्केद्यक घटना जळगाव शहरातील खंडेराव नगरात रेल्वे रुळाच्या बाजूला घडली आहे. अमर वसंत सपकाळे वय ४२, रा.खंडेराव नगर, जळगाव असं मृत तरुणाचं नाव असून या हत्या प्रकरणात रामानंद नगर पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. याबाबत सखोल चौकशी पोलीस करीत आहे.

जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात लाँड्री व्यावसाय करणारे मृत अमर सपकाळे हे १३ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे रात्री घरातून गेले होते. मात्र ते घरी परतले नाहीत आणि त्यानंतर १५ रोजी सकाळी शहरातील खंडेराव नगर परिसरातील रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृत अवस्थेत आढळून आले. सुरुवातीला रेल्वे अपघाताची ही घटना आहे. असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, रामानंदनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आणि हा रेल्वे अपघात नसून खून असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी तपासादरम्यान एका अल्पवयीन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे, चौकशीदरम्यान त्याने सदर  गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयित अल्पवयीन आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या रात्री संशयित दोन आरोपी रेल्वे रुळाजवळ सिगारेट पीत बसले होते. त्याच वेळी लाँड्री व्यावसायिक अमर सपकाळे त्या ठिकाणी आला. तो दारूच्या नशेत होता. नशेत असलेल्या अमर सपकाळे यांनी आरोपींना काही कारणावरून शिवीगाळ केली. याच रागातून दोन्ही आरोपींनी सपकाळे यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची रेल्वे रुळाजवळ हत्या केली.

या हत्या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले असले तरी, दुसरा आरोपी  अद्याप फरार आहे. रामानंदनगर पोलीस या दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध घेत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान संशयित आरोपीमध्ये इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---