---Advertisement---

अयोध्या येथे अल्पवयीन तरुणीची आत्महत्या, बोदवडच्या तरुणाला अटक

---Advertisement---

बोदवड : सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. या सोशल मीडियाच्या ओळखीतून मुला-मुलींची फसवणूक होत असल्याचा घटना नित्य नियमाने समोर येत आहे. अशा स्वरुपात सोशल मीडियाच्या ओळखीतून उत्तर प्रदेश येथील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे घटना घडली आहे. या घटनेबाबत अधिक चौकशीकरिता उत्तर प्रदेशाचे पोलीस पथक थेट बोदवड शहरात दाखल झाले होते. या पोलीस पथकाने अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणांत दोन दिवस सखोल चौकशी केली. या चौकशीअंतर्गंत बोदवड येथील एका तरुणाला त्यांनी ताब्यात घेतले. यानंतर या पोलीस पथकाने उत्तर प्रदेशाकडे प्रयाण केले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील जन्मभूमी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. त्या मुलींचे वय साडेसोळा वर्ष होते. मुलीने आत्महत्या का केली ? याबाबत उत्तर प्रदेशातील पोलीस चौकशी करीत होते.

---Advertisement---

त्यातच या तरुणीची सोशल मीडियावर महाराष्ट्रातील बोदवड येथील तरुणासोबत ऑनलाईन मैत्री झाली. तिने या प्रकरणातच आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या तरुणीच्या मोबाइलची हिस्ट्री तपासली असता उत्तर प्रदेश पोलिसांना बोदवड येथील संपर्क क्रमांक आढळून आला. या नम्बरवरुन माग काढत अयोध्या येथील पोलिस बोदवड शहरात दाखल झाले होते.

त्यांनी याप्रकरणी त्यांनी बोदवड शहरातील कुरेशी वाड्यात राहणारा विवाहित समीर कुरेशी या तरुणाची चौकशी केली. त्याची गुरुवारी (दि. २६ जून) रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर अयोध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील चौकशीसाठी अयोध्या येथे सोबत घेऊन गेले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---