जळगाव मनपाची क्यूआर कोड प्रणाली; घरबसल्या नागरिकांना तक्रार नोंदविण्याची सुविधा

---Advertisement---

 

शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आता नागरिकांना महानगरपालिकेच्या चकरा मारण्याची किंवा अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर ताटकळत बसण्याची गरज उरलेली नाही. मनपाने आता थेट क्यूआर कोड प्रणाली लाँच केली आहे. हा कोड स्कॅन करताच नागरिकांना घरबसल्या मनपाच्या १० प्रमुख विभागांशी संबंधित तक्रारी थेट प्रशासनाच्या दरबारी नोंदवता येणार आहेत.

पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारी, खड्डे किंवा कचऱ्याची समस्या असो; आता फक्त मोबाईल काढायचा, क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि तक्रार दाखल करायची, अशी अत्यंत सोपी आणि प्रभावी प्रणाली ई-गव्हर्नन्स विभागाने विकसित केली आहे. विशेष म्हणजे, यात तक्रारीसोबत थेट घटनास्थळाचा फोटो आणि कागदपत्रांची पीडीएफ जोडण्याची सुविधा दिल्याने अधिकाऱ्यांना आता तक्रारींकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

अशी नोंदविता येईल तक्रार…
१) मोबाईलद्वारे मनपाचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर स्क्रीनवर Complaint Registration असा पर्याय दिसेल.
२) यानंतर ज्या विभागाची तक्रार आहे तो विभाग, तक्रारीचा प्रकार, उपप्रकार आणि आपला प्रभाग निवडावा लागेल.
३) नागरिकांना आपले नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि संपूर्ण पत्ता नोंदवावा लागेल.
४) तक्रार नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती आणि स्थळदर्शक खूण टाकावी लागेल. यासोबतच समस्येचा फोटो किंवा आवश्यक पीडीएफ फाईल अपलोड करता येईल.
५) शेवटी स्क्रीनवरील कॅपचा कोड टाकून तक्रार सबमिट करताच ती थेट मनपाच्या सिस्टीममध्ये दाखल होईल.
या १० विभागांच्या तक्रारी करता येणार
पाणीपुरवठा विभाग
स्वच्छता आणि घनकचरा विभाग
बांधकाम विभाग
विद्युत विभाग (पथदिवे)
घरपट्टी (मालमत्ता कर) विभाग
आरोग्य विभाग
नगररचना विभाग
सामान्य प्रशासन विभाग
जन्म-मृत्यू नोंदणी विभाग

जाहिरात विभाग
अधिकाऱ्यांना आता गाठावेच लागणार नागरिक
नागरिकांनी क्यूआर कोडद्वारे तक्रार नोंदवताच ती सर्वप्रथम मनपाच्या ई-गव्हर्नन्स विभागाकडे जाईल. तिथून ती तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग केली जाईल. यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन तक्रारीची शहानिशा करावी लागेल आणि थेट तक्रारदाराशी संपर्क साधून ती समस्या सोडवावी लागेल. समस्या पूर्णपणे सुटल्यानंतरच नागरिकांच्या मोबाईलवर तक्रार निवारण झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---