---Advertisement---
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. बहाळ येथील समाजबांधव अशोक ताराचंद शिंपी यांची कन्या कु. मोहीनी अशोक शिंपी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) स्थान मिळवले आहे.
मोहीनीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण गाव आणि शिंपी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर मोहीनीने UPSC सारखी देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करत IAS अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.
मोहीनी शिंपी हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, सुरत तसेच गुजरात राज्य शिंपी समाजाच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
समाजातील तरुण-तरुणींना प्रेरणा देणारे हे यश असल्याचे समाजबांधवांनी सांगितले. मोहीनी शिंपी हिच्या यशामुळे बहाळ गावासह संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल झाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.









